Love Marriage

लोक म्हणतात, हल्ली लव्ह मॅरेजेस जास्त होतात. आपल्याला ते पटतं. लोक म्हणतात, अलीकडे लग्नं जास्त मोडतात.उघडय़ा डोळ्यांनी, समकालीन वास्तव बघणाऱ्या कोणालाही हे पटण्यासारखं असतं. पण ‘‘एवढं लव्ह मॅरेज असूनसुद्धा..’’ लग्नमोडलं म्हणून लोक आश्चर्य व्यक्त करतात, ते मात्र आपल्याला निदानपक्षी मला पटत नाही.
लव्ह मॅरेज किंवा प्रेमलग्न जास्त टिकणार टिकायला हवं हे आपण कोणत्या विश्वासावर मानतो? तर त्या वधूवरांनी स्वत:च्यापसंतीने लग्न केलंय, म्हणजे त्यांनी एकमेकांना पुरतं ओळखलं असणारच या विश्वासावर. जास्त काळ एकत्र घालवला म्हणजेमाणसं एकमेकांना जास्त नीट पारखतील हा विश्वासच मुळात तपासून घेण्याजोगा आहे. ती संधी मिळेल हे खरं, पण ती वापरलीजाईलच अशी हमी कोणकधी देऊ शकेल? तितकी प्रगल्भता किती लोकांमध्ये असते? याइतकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे

इतक्या गंभीरपणे लग्न ठरवण्याकडे किती लोकांनी बघितलेलं असतं?
तर तसं तितकंसं बघितलेलं नसतं असं मानण्याला जागा दिसते. अलीकडे पुष्कळवेळा शिक्षणनोकरी व्यवसाय अशा कारणांनी तरुणतरुणी एकमेकांसमोरयेतात. रोज किंवा वरचेवर बघून बघून एकमेकांनाबरेवाटायला लागतात. एकमेकांची पदवीपगार असे निश्चित मोजतायेण्याजोगे निकष ते तपासून घेतात. कारण त्यात फसवाफसवी करणं सहज शक्य नसतं. (काही महाभाग त्याही बाबतीतसफाईने फसवू शकतात. याला इतिहास आणि वर्तमान साक्ष आहे!) बरोबर जास्त वावरणं झालं की एकमेकांच्या आवडीनिवडीसवयीलकबी जास्त कळायला लागतात. यौवनाच्या भरात एकमेकांना खूश करण्यासाठी या माहितीचा हुशारीने वापर केलाजातो आणि एक दिवस दोघांपैकी एक जणम्हणजे बहुधा जोडीपैकी पुरुषदुसऱ्याला तो लाख मोलाचा प्रश्न विचारतात, ‘‘माझ्याशी लग्न करशील?’’ हा प्रश्न विचारण्याच्या अगोदर संभाव्य जोडीदाराचं घरदार बघणं, जवळच्या नातेवाईकांना भेटणं,त्यांची दैनंदिन जगण्याची पद्धती बघणं, त्यांचा मूल्यविवेक बघणं, त्यांचा भूतकाळ आणि आपल्या स्वत:च्या भविष्याविषयीच्याकल्पना यांचा मेळ लागतो की नाही हे तपासणं अनेकांना जमत नाही. किंवा गरजेचं वाटत नाही. एकूण प्रेमलग्नसंसार याकल्पनांचं आत्यंतिक गारुड त्या टप्प्यांवर मनावर असतं आणि ‘‘आम्हीही हे करू शकतो’’ हे दाखवण्याची हौस अनावर होते.
नव्याच्या नऊ दिवसातच या हौसेवर पाऊस पडायला लागतो. मुलींच्या बाजूने अगोदरच लागतो कारण त्यांना स्वत:चं घरदारमाणसंपरिसर हे सोडून अचानक एका नव्या वेगळ्या परिस्थितीला सामोरं जायचं असतं. संपूर्ण शाकाहारी मुलीनं मांसाहारकरणाऱ्या घरात जाणं, खेडवळ मुलीनं महानगरी, पॉश घरामध्ये जाणं इतके टोकाचे फरक तर दूरच पण साधं शिक्षणाचंमाध्यम, विशिष्ट देवाचीबुवाची भक्ती, कुटुंबाच्या माणसांची संख्या, त्यांच्यातल्या नातेसंबंधांचे तिढे यांच्यामधूनही जोडप्याच्यानात्यात ताण यायला लागतात. तीव्र शारीरिक आकर्षणाचा सुरुवातीचा काळ संपला की ताणांची तीव्रता जाणवते आणि ज्यालग्नसंबंधामुळे याकटकटीवाटय़ाला आल्या ते लग्नच नको इथवर काहींची मजल जाते. आसपास कुजबुजीला विषय मिळतो, ‘‘एवढं लव्हमॅरेज असूनसुद्धा..’’
खरं तर लव्ह मॅरेजमध्येएवढं तेवढंकाही नाही! त्याच्या आदर्श स्वरूपात असेल, पण नित्य व्यवहारात नाही. घरच्यांच्यासांगण्यावरून भावी वधूवर लग्नापूर्वी पाचसात वेळा भेटूनॅरेंज्ड मॅरेजकरतात. तर स्वेच्छेने लग्नापूर्वी पन्नाससाठ वेळाभेटलेले तरुण वधूवरलव्ह मॅरेजकरतात एवढाच तपशिलात फरक. शिवाय वेगळ्या अर्थाने लव्ह मॅरेजवाले निराधारहीअसतात.
वास्तविक स्वत:चं लग्न स्वत: जमवणं, अपरिपक्व वयामध्ये आयुष्यभराचा वायदा एखाद्या व्यक्तीशी स्वत:च्या हिमतीवरकरणं ही एक अवघड जोखीम आहे. आईबाप किंवा घरचे मोठे लोक मुलांची लग्नं जमवायचे तेव्हा पुढे त्या लग्नात काहीहीखटकलं, फिसकटलं तर त्याचं खापर फोडायला मुलांना एक हक्काची जागा मिळायची. ‘त्यांनी असं कसं लग्न जमवलं? ‘त्यांनीकशी घाई केली, ‘त्यांची दूरदृष्टी कशी कमी पडली हे रंगवून (निदान स्वत:ला तरी) सांगता यायचं. लव्ह मॅरेजवाल्यांना ही सूटहीउरत नाही. आपल्या अपयशाला टांगायला आईबाप ही एकलाडकी खुंटीप्रत्येक उभरत्या पिढीला असते. तीही या पठ्ठय़ांनीगमावलेली असते. चांगलं झालं तर कोणी फारसं कौतुक करणार नाही, पण वाईट झालं तर क्षणोक्षणी उद्धार व्हायचा थांबणारनाही. ‘‘एवढं लव्ह मॅरेज असूनसुद्धा..’’
जवळजवळ दोन र्वष हिंडून फिरून प्रेमलग्नात शिरलेलं माझ्या परिचयातलं एक तरुण जोडपं लग्नानंतर वर्षभरात वेगळं झालं.


PS: This is not written by me. Courtesy: An E-mail from a friend

PPS: I’m not saying I agree to this view completely. I partially do.

PPPS: Before commenting anything on this post, please read my next post.

PPPPS: This e-mail exactly comes when I’m all confused between love marriage and arranged marriage. Talk about artificial intelligence.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: