Happy Mother’s Day

“अरे प्रतीक, उठ जरा! जा, जाऊन भाजी आण!”

“ए झोपू दे न ग आई! काल उशीर झाला झोपायला…” (मी आपला रात्री gtalk  आणि facebook वर ‘busy ‘ असल्यामुळे साहजिक च सकाळी उशिरा उठणार)
माझी किरकिर सुरु च होती. नव्हतं जायचं मला!

“अरे उठ ना रे! मी काय रोज जायला सांगते का तुला?”

“मी रोज गेलो पण नसतो” मी ठामपणे सांगितले. असली कामं नाही जमत मला. कशाला सांगत असतेस? मी मनातच बोललो.

“अरे म्हणूनच! आज चे दिवस तरी जा”

“बंर! ठीके! काय काय आणायचंय?” मी चिडचिड करत उठलो.

“ही घे list. नीट बघून आण भाज्या. खालच्या stalls वर चांगल्या मिळतात भाज्या”

झोपेचं खोबरं झालं म्हणून स्वतःशीच चीडचीड करत मी जवळ च्या Reliance Store मध्ये गेलो. Stallsच काही बुवा आपल्याला कळत नाही, तिथे आई करते तशी bargaining काही आपल्याला जमत नाही, ह्या विचाराने मी Reliance वर “Rely ” करायचे ठरवले. तिथे खूप भाज्या होत्या. List बघितली. भाज्या निवडताना कुठली चांगली कुठली खराब हे कळतच नव्हतं. “वास घ्यावा का?” मी मनाशीच म्हटलं. तेवढ्यात एक काका आले. माझ्यासमोरच्या भाजी च्या टोपल्यातील भाजी पटापट निवडून पुढे गेले. मला काही कळलंच नाही. “ह्यांनी काय बघून भाजी निवडली?”. आई ची आठवण आली. “आई ला बरं कळतं भाज्यांचं. आपलं कधी डोकं चालणार? कि मला अनुभव नसल्यामुळे “confusion” होतंय? जाऊ दे! जास्त डोकं नको लावायला” असा विचार करीत मग मी पटपट भाजी घेतली. एखाद्या भाजी समोर म्हणजे कोबी दिसली तेव्हा उगाच कोबी हातात धरून तिचे चौफेर निरीक्षण करून “ही दिसायला तर shape मध्ये uniform दिसते आणि रंग पण कसा हिरवागार आहे!” असे निरीक्षण लावून मी “मला पण कळतं. मी जिंकलोय”  ह्या आविर्भावात भाजी घेतली आणि घरी गेलो.

दुपारी जेवणात कोबी होती. खूप चरबट लागली. चव जरा वेगळीच होती. मी आई कडे त्याची complaint सुरु केली. आई, “थांब भाजी जरा ठीक करून देते” म्हणाली. तेवढ्यात मला सकाळी भाजी आणल्यानंतर आई ने केलेली तक्रार आठवली. “भाजी fresh बघून का नाही आणली? कोबी निव्वळ कच्ची आहे.” पुढच्या terms मला काही कळाल्या नाहीत. “मग असली कामं मला सांगत नको जाऊ” असे मी तिला निक्षून सांगत पुढचे conversation ignore केले. ह्या सगळ्यांचा विचार करत असताना आईने परत शिजवलेली भाजी समोर ठेवली. मला स्वतःचीच लाज वाटली. मीच भाजी आणली होती आणि मीच आता complaint करतोय.  मला कळायला हवं. आई सोबत चारदा जाऊन भाजी आणली तर च कळेल, कसं असतं ते? भाज्यांचंच काय? कुठून श्रीरामपूरचेच पापड मागव. नाशिककडचाच भात आण. अमुक ठिकाणचेच तमुक मागव and so on! अशी सगळी धडपड सुरु च असते तिची. बायकांची कामं mindless असतात असा बर्याच पुरुषांचा (गैर)समज आहे. पण आज भाजी आणल्यावर मला कळालं कि आमच्या “so called ” brain ला योग्य “खुराक” पोचवण्यासाठी बनवलेल्या जेवणासाठी पण किती विचार करावा लागतो! रोज चा मेनू विचारपूर्वक वेगळा ठेवणे. अमुक गोष्टी सोबत तमुक खाल्ल्यास ते बाधते ह्याचे लक्ष ठेवणे. परीक्षेच्या वेळी, गरमागरम पण सुस्ती न आणणारे पौष्टिक जेवण घालणे, हे सगळं आईलाच कसं भारी कळत. घरातली प्रत्येक वस्तू, खायची, वापरायची, आई किती काळजीने आणि विचारपूर्वक आणते. मला complaint करायला सोपं आहे कि “हा कप च हिडीस आहे. आज जेवण च नाही आवडलं. घरात घाण च किती.” complaints काही थांबत नाहीत. पण शेवटी आई आमच्याच सोयी साठी तर झटते.  धन्य आहे स्त्री जात. कमाल आहे आई ची. मी आई ला मनातल्या मनात “sorry” म्हटलं आणि खूप धन्यवाद दिले.

Oh , BTW , Happy Mother ‘s Day …!!! Respect your Mother and care for her. We have no idea how much she cares for us, in small and little ways!
Advertisements

17 thoughts on “Happy Mother’s Day

 1. Akshay May 10, 2010 at 5:09 am Reply

  mast ahe!!!

 2. FrostBite May 10, 2010 at 5:32 am Reply

  🙂

 3. Anuja May 10, 2010 at 5:47 am Reply

  Lovely post…

 4. Atreyee May 10, 2010 at 6:12 am Reply

  Awesome re! Did ur mom read this?She'll be proud!And its not just about things, its even about our feelings, mothers always understand what we need, what we are feeling and what will make us feel better. They are just awesome!

 5. NEER May 10, 2010 at 6:41 am Reply

  yeah u should show this post to your mom!We complain a lot, don't we? 😛 But still she never complains back to us!Great post!Keep writing! \m/Care,Neer

 6. Parag kale....(Pk)...... May 10, 2010 at 6:46 am Reply

  marathi madhe vachun khup aanad zhala ….. 🙂 …chaan lehtoos …..

 7. neha rana May 10, 2010 at 7:11 am Reply

  very well written prats…had tears in my eyes..missed my mom…and all such arguments…please show this post to ur mom…she will be happy to read it…

 8. shital May 10, 2010 at 2:34 pm Reply

  good one

 9. minal May 10, 2010 at 3:02 pm Reply

  Had tears in my eyes while reading it Pratik.Though it seems very much like u ,Keep Up Ur sensitivity.God bless u!!

 10. Pratim May 10, 2010 at 6:46 pm Reply

  i learnt…i need to learn reading marathi….

 11. dis i a great post ! i have faced this vry same situation !

 12. somethinfresh May 13, 2010 at 5:34 am Reply

  Ashakya arre Pratik. Bekkar avadla!

 13. Sanyo May 14, 2010 at 3:06 pm Reply

  mast aahe 🙂

 14. shrilekha August 7, 2010 at 2:22 pm Reply

  nice 1

 15. SHRIKANT May 7, 2011 at 12:38 pm Reply

  pratik mast aahe re……… aai he vyaktimattva aahech mahan…!!!
  devala pratek gharat pratek manasajaval rahata yet navhta mhanun tyne aai chi nirmiti keli asaavi….
  mhantat na
  AAI MAJHA GURU, AAI KALPTARU
  SOUKHYACHA SAGARU AAI MAJHI…..

 16. MUGDHA GOEL May 8, 2011 at 7:40 am Reply

  khara re, far khara ahe he…

 17. Vallabh Patade May 9, 2011 at 6:22 pm Reply

  Khupach bhari re… Mast

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: